new york protesters

न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला …
न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या ईशान्य भागातील एक राज्य आहे. न्यू यॉर्क हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. न्यू यॉर्कच्या उत्तरेला कॅनडाचे ओन्टारियो व क्वेबेक हे प्रांत, वायव्येला ओन्टारियो सरोवर, पूर्वेला ईरी सरोवर, दक्षिणेला पेनसिल्व्हेनिया व न्यू जर्सी, आग्नेयेला अटलांटिक महासागर तर पूर्वेला व्हरमॉंट, कनेटिकट व मॅसेच्युसेट्स ही राज्ये आहेत. आल्बनी ही न्यू यॉर्क राज्याची राजधानी असून न्यू यॉर्क शहर हे अमेरिकेतील सर्वात मोठे शहर ह्याच राज्याच्या अखत्यारीत येते. न्यू यॉर्क राज्य आणि न्यू यॉर्क शहर ह्यांत फरक करण्यासाठी बरेच वेळा राज्याचा उल्लेख 'न्यू यॉर्क राज्य' असा स्पष्टपणे केला जातो.
  • ध्वज: चिन्ह
  • अधिकृत भाषा: इंग्लिश
  • राजधानी: आल्बनी
  • मोठे शहर: न्यू यॉर्क शहर
  • क्षेत्रफळ: अमेरिकेत २७वा क्रमांक
  • लोकसंख्या: अमेरिकेत ३वा क्रमांक
  • संक्षेप: US-NY
यांसकडून डेटा: mr.wikipedia.org